सफ.
सफन्या
लेखक
सफन्या 1:1 मध्ये लेखक स्वतः “सफन्या बिन कूशी बिन गदल्या बिन अमऱ्या बिन हिज्कीया” म्हणून ओळखला जातो. सफन्या या नावाचा अर्थ “देवाकडून संरक्षित” असा होतो, विशेषतः यिर्मयातील एक याजक (21:1; 29:25, 29; 37:3; 52:24), पण वर उल्लेख केलेल्या सफन्याशी कोणताही संबंध नाही. अनेकदा दावा केला आहे की, सफन्याकडे आपल्या पूर्वजांनुसार शाही पार्श्वभूमी होती. यशया आणि मीखा यांच्या काळापासून यहूदाविरुद्धच्या भविष्यवाण्यांविषयी लिहिणारा पहिला संदेष्टा सफन्या होता.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 640 - 607.
पुस्तकातून आपल्याला हे सांगण्यात आले की सफन्याने यहूदाचा राजा योशीया याच्या कारकिर्दीत भविष्यवाणी केली होती (सफन्या 1:1).
प्राप्तकर्ता
यहूदाचे लोक (दक्षिणेकडचे राज्य) आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्र.
हेतू
न्यायाच्या आणि उत्तेजनाबद्दलच्या सफन्या याच्या संदेशात तीन प्रमुख शिकवणी आहेत, देव सर्व राष्ट्रांवर प्रभुत्व आहे, दुष्टांना दंड होईल आणि न्यायाच्या दिवशी नीतिमानांना योग्य ठरवण्यात येईल, जे लोक पश्चात्ताप करतात व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना देव आशीर्वाद देतो.
विषय
परमेश्वराचा महान दिवस
रूपरेषा
1. परमेश्वराच्या विनाशाचा येणारा दिवस — 1:1-18
2. आशेचा मध्यस्थ — 2:1-3
3. राष्ट्रावरील विनाश — 2:4-15
4. यरूशलेमेवरील नाश — 3:1-7
5. परतण्याची आशा — 3:8-20