DAN intro

☀️

दानि.

दानिएल

लेखक

त्याच्या लेखकाच्या नावावरून नाव दिले गेले, दानिएलचे पुस्तक बाबेलमध्ये त्याच्या काळातील एक उत्पादक आहे ज्याने इस्त्राएलमधून यहूद्यांना हद्दपार केले. “दानिएल” या नावाचा अर्थ “देव माझा न्यायाधीश आहे” असा आहे. या पुस्तकात असे सूचित केले आहे दानिएल हा अनेक परिच्छेदाचा लेखक होता, जसे की 9:2; 10:2. दानिएलने बाबेलच्या राजधानीत त्याच्या काळात यहूद्यांच्या निर्वासनासाठी त्याचे अनुभव आणि भविष्यवाण्या नोंदवल्या, जेथे सेवेमुळे राजाने त्याला उच्च स्तरावर विशेषाधिकार दिला. आपल्या भूमीवर व संस्कृतीत परमेश्वराची विश्वासूपणे सेवा करणे त्याला स्वतःला शास्त्रवचनातील जवळजवळ सर्व लोकांमध्ये अद्वितीय बनविते.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 605 - 530.

प्राप्तकर्ता

बाबेलमधील बंदिवान यहूदी आणि पवित्र शास्त्राचे इतर सर्व वाचक.

हेतू

दानिएलचे पुस्तक संदेष्टा दानिएलच्या कृत्या, भविष्यवाण्या आणि दृष्टांत नोंदवतात. पुस्तक शिकवते की देव त्याच्या अनुसरणाऱ्यांशी विश्वासू आहे. मोह आणि जबरदस्ती असूनही, विश्वास ठेवणारे पृथ्वीवरील कर्तव्ये पार पाडताना देवाला विश्वासू राहणे आवश्यक आहे.

विषय

देवाचे सार्वभौमत्व

रूपरेषा

1. दानिएलचे महान पुतळ्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणे — 1:1-2:49

2. शद्रख, मेशख व अबेद्नगो यांची अग्नीच्या भट्टीतून सुटका केली — 3:1-30

3. नबुखदनेस्सरचे स्वप्न — 4:1-37

4. हलणारे बोट लिहिते आणि दानिएल विनाशाविषयी भविष्यवाणी करतो — 5:1-31

5. सिंहाच्या गुहेत दानिएल — 6:1-28

6. चार श्वापदांचे स्वप्न — 7:1-28

7. एक मेंढा, शेळी आणि एडक्याचा दृष्टांत — 8:1-27

8. दानीएलच्या प्रार्थनेचे 70 वर्षे उत्तर होते — 9:1-27

9. अंतिम महान युद्धाविषयी दानिएलचा दृष्टिकोन — 10:1-12:13

Navigate to Verse