ACT intro

☀️

प्रेषि.

प्रेषितांची कृत्ये

लेखक

वैद्य, लूक, या पुस्तकाचा लेखक आहे. लूक प्रेषितांमधल्या अनेक घटनांविषयी साक्षीदार होता कारण त्याच्या बऱ्याच भागांमध्ये ‘आपण’ वापरल्याची पुष्टी केली आहे (16:10-17; 20:5-21:18; 27:1-28:16). पारंपारिकरित्या त्याला अन्य जातीय म्हणून पाहिले गेले आहे, तो प्रामुख्याने सुवार्तिक होता.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 60 - 63.

लिखित स्वरूपाचे महत्त्वाचे स्थळ यरूशलेम, शोमरोन, लिडा, याप्पा, अंत्युखिया, इकॉनिअम, लिस्त्र, डर्बी, फिलिप्पै, थेस्सलनीका, बीरिया, अथेन्स, करिंथ, इफिस, कॅसरेआ, माल्टा, रोम असू शकते.

प्राप्तकर्ता

लूकने थियाफिलास लिहिले (प्रेषित 1:1). दुर्दैवाने, थियाफिल कोण होता याबद्दल फारसे माहिती नाही. काही संभाव्य शक्यता आहेत की तो लूकचा आश्रयदाता होता, किंवा थियोफिलसला (याचा अर्थ “परमेश्वराचा प्रेमी”) सर्व ख्रिस्ती लोकांना संदर्भित म्हणून सर्वत्र वापरले जात आहे.

हेतू

प्रेषितांचा हेतू मंडळीचा जन्म (उदय) आणि वाढीची कथा सांगण्यासाठी आहे, हा संदेश बाप्तिस्मा देणारा योहान, येशू आणि त्याच्या बारा प्रेषितांनी शुभवर्तमानांमध्ये सुरू केला. हे आम्हाला पेंटेकॉस्टच्या दिवशी येणाऱ्या पवित्र आत्म्यापासून ते येणाऱ्या ख्रिस्तीपणाचे विस्तृत प्रसाराची नोंद आम्हाला देते.

विषय

सुवार्तेचा प्रसार

रूपरेषा

1. पवित्र आत्म्याचे अभिवचन — 1:1-26

2. पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण — 2:1-4

3. पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यरूशलेमे मधील सेवाकार्ये व लोकांकडून सभेचा सताव — 2:5-8:3

4. पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यहूदिया आणि शोमरोन मधील सेवाकार्ये — 8:4-12:25

5. पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून जगाच्या शेवटापर्यंत केलेली सेवाकार्ये — 13:1-28:31

Navigate to Verse