2 तीम.
तीमथ्याला दुसरे पत्र
लेखक
रोममध्ये तुरुंगातून सोडल्यानंतर आणि त्याच्या चौथ्या प्रचारक दौऱ्यानंतर, त्याने 1 तीमथ्य लिहिले त्या वेळी, पौल पुन्हा सम्राट निरोच्या तुरुंगात होता. याच काळात त्याने 2 तीमथ्य लिहिले. त्याच्या पहिल्या कारावासच्या तुलनेत, जेव्हा तो ‘भाड्याच्या घरात’ राहत होता (प्रेषित 28:30), तेव्हा आता तो सामान्य गुन्हेगारासारखा (4:13) थंड तांबुस पडला होता (1:16; 2:9) पौलाला हे माहीत होते की त्याचे काम पूर्ण झाले आणि त्याचे जीवन जवळजवळ संपले (4:6-8).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 66 - 67.
पौल रोम मध्ये त्याच्या दुसऱ्यावेळी तुरुंगवासामध्ये होता आणि आपल्या हौतात्म्याची प्रतीक्षा करीत असताना त्याने हे पत्र लिहिले.
प्राप्तकर्ता
तीमथ्य हा 2 तीमथ्य या पत्राचा मुख्य वाचक होता, परंतु निश्चितपणे त्याने मंडळीसमोर हा विषय मांडला.
हेतू
तीमथ्याला अंतिम प्रोत्साहनात्मक व प्रोत्साहित करण्याबरोबरच पौलाने त्याला धैर्याने (1:3-14), केंद्रित (2:1-26) आणि धीर धरायला (3:14-17; 4:1-8) सोपवले होते.
विषय
विश्वासू सेवाकार्याला आकार
रूपरेषा
1. सेवाकार्यातील प्रेरणा — 1:1-18
2. सेवाकार्यातील नमुना — 2:1-26
3. खोट्या शिकवणी विरुद्ध चेतावणी — 3:1-17
4. प्रोत्साहनाचे बोल व अंतिम शब्द — 4:1-22