1TI intro

☀️

1 तीम.

तीमथ्याला पहिले पत्र

लेखक

पत्राचा लेखक पौल आहे, 1 तीमथ्याचा मजकूर स्पष्टपणे सांगतो की प्रेषित पौलाने “पौल, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित” (1 तीमथ्य. 1:1) असे लिहिले होते. प्रारंभिक मंडळीने ते खरोखरच पौलाची लेखणी म्हणून स्वीकारले होते.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 62 - 64.

जेव्हा त्याने इफिसमध्ये तीमथ्याला सोडले, तेव्हा तो मासेदोनियाला गेला, जेथे त्याने त्याला लिहिले (1 तीमथ्य. 1:3; 3:14, 15).

प्राप्तकर्ता

1 तीमथ्य हे नाव देण्यात आले कारण ते तीमथ्याला उद्देशून आहे, जो पौलाच्या प्रचारक प्रवासात सहकारी व मदतनीस होता. तीमथ्य आणि संपूर्ण मंडळी ही दोन्ही 1 तीमथ्याचे वाचक आहेत.

हेतू

देवाचे घर स्वतः कसे चालले पाहिजे हे तीमथ्याला सांगण्याकरिता (3:14-15) आणि तीमथ्याने या सूचनांचे पालन कसे करायचे होते हे सांगितले. ही वचने 1 तीमथ्य पुस्तकाच्या पौलाविषयीच्या निवेदनानुसार कार्य करते. त्यांनी असे लिहिले आहे की ते लोक देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या दृष्टीने कारक म्हणजे निरपराध लोकांच्या कारभाऱ्यांप्रमाणे ओळखतात, ते सत्य लोकांना जीवन सांगते आणि या मार्गाद्वारे, पौल मंडळ्यांना बळकट व बांधणी करण्याच्या पद्धतींवर आपल्या माणसांना पत्र पाठवत आणि सूचना देत आहे.

विषय

तरुण शिष्यासाठी सूचना

रूपरेषा

1. सेवाकार्यातील सराव — 1:1-20

2. सेवाकार्यातील सिद्धांत — 2:1-3:16

3. सेवाकार्यातील जबाबदाऱ्या — 4:1-6:21

Navigate to Verse