1SA intro

☀️

1 शमु.

1 शमुवेल

लेखक

हे पुस्तक लेखकाचा दावा करत नाही. तथापि, शमुवेलाने कदाचित लिहिले असावे, आणि त्याने 1 शमुवेल 1:1-24:22 या वचनाची माहिती दिली, जी त्याच्या मृत्यूपर्यंत जीवन आणि कारकीर्द याचे एक चरित्र आहे. हे शक्य आहे की भविष्यवक्ता शमुवेलाने या पुस्तकाचे काही भाग लिहिले. 1 शमुवेलाचे शक्य योगदानकर्ते संदेष्टे/इतिहासकार नाथन आणि गाद (1 करिंथ 29:29) आहेत.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 1050 - 722.

इस्राएल आणि यहूदा यांच्यातील राज्याची विभागणी झाल्यानंतर लेखकाने हे पुस्तक लिहिले, इस्त्राएल आणि यहूदाच्या अनेक संदर्भांमुळे वेगळे अस्तित्व असल्यामुळे हे स्पष्ट आहे. (1 शमुवेल 11:8; 17:52; 18:16; 2 शमुवेल 5:5; 11:11; 12:8; 19:42-43; 24:1, 9).

प्राप्तकर्ता

पुस्तकाचे मूळ वाचक इस्राएल आणि यहूदाच्या विभाजित राजेशाहीचे सदस्य होते ज्यांना दाविदाच्या राजवंशाच्या वैधतेवर व उद्देशाने दैवी दृष्टिकोन असणे आवश्यक होते.

हेतू

1 शमुवेलाने कनानमधील इस्राएलच्या इतिहासाची नोंद केली जेणेकरून ते राजांच्या अधिपत्याखाली एक संयुक्त राष्ट्राचे राज्य बनतील. शमुवेल शेवटच्या शास्त्यांप्रमाणे उदय पावतो आणि त्याने पहिले 2 राजे, शौल आणि दावीद यांना अभिषिक्त केले.

विषय

परंपरा

रूपरेषा

1. शमुवेलाचे जीवन आणि सेवाकार्य — 1:1-8:22

2. इस्त्राएलाच्या पहिल्या राजासारखे शौलाचे जीवन — 9:1-12:25

3. राजा म्हणून शौलाचे अपयश — 13:1-15:35

4. दाविदाचे जीवन — 16:1-20:42

5. दाविदाचा इस्त्राएलाचा राजा म्हणून अनुभव — 21:1-31:13

Navigate to Verse